
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, क्रिती सॅनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा बच्चन पांडे हा सिनेमा 18 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

बच्चन पांडेच्या प्रदर्शनाआधी या सिनेमातील कलाकार प्रमोशन करताना दिसत आहेत.

मुंबईत अक्षय कुमार, क्रिती सॅनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस हे प्रमोशन करताना पहायला मिळाले.

या प्रमोशनवेळी या कलाकारांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

बच्चन पांडे या चित्रपटामध्ये अक्षय कुमार एका क्रिमिनल्स रोलमध्ये दिसणार आहे आणि अक्षयसोबत क्रिती सेनोन, अरशद वारसी, जॅकलीन फर्नांडिस आणि पंकज त्रिपाठी सुद्धा या सिनेमात आहे.