
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला तिच्या चुलत बहीणीने म्हणजेच अलाना पांडेनं टक्कर दिली आहे. तिचे प्रत्येक फोटो हॉटनेसने भरलेले आहेत. तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आणि तो लगेच व्हायरल झाला. आज आम्ही तुम्हाला अलाना बद्दल काही गोष्टी सांगणार आहोत.

अलाना पांडे तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अलाना पांडे ही अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण आहे आणि स्वतःला व्यवसायाने एक मॉडेल आहे.

अनन्या पांडे प्रमाणे अलानाला चित्रपटांमध्ये आपलं नाव कमवायचं नाही. अलाना तिच्या मॉडेलिंग विश्वात खूप आनंदी आहे. अलाना खूप फिट आहे आणि तिच्या सौंदर्याची खूप काळजी घेते.

अलाना पांडे तिचा बॉयफ्रेंड इव्होर मॅकक्रे व्ही सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. ती इवरसोबत हॉट फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत राहते. तिच्या कुटुंबालाही अलाना लिव्ह-इनमध्ये राहण्यास काहीच हरकत नाही.

अलाना पांडे अवघ्या 22 वर्षांची आहे आणि तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती तिच्या प्रत्येक फोटोमुळे खूप चर्चेत असते.

अलाना पांडेने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून पदवी प्राप्त केली आहे. ती एक मॉडेल आणि फॅशन इन्फ्लूएंसर म्हणून आपले करिअर करत आहे. तिने फॅशन डिझायनर्ससोबतही काम केलं आहे.

अलाना पांडे अनन्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये पाऊल टाकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण तिचे फॅन फॉलोइंग बघता असे म्हणता येईल की तिची लोकप्रियता बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.