
अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) 2020 मध्ये 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

आलायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं, पण तिला अद्यापही हवी तेवढी लोकप्रियता मिळालेली नाही.

सोशल मीडियावर आलाया हे नाव प्रसिद्ध असलं, तरी बॉलिवूडमध्ये आलायाचं स्थान भक्कम झालेलं नाही.

सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा रंगत असते. आलायाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेटं आणि लाईक्सचा वर्षाव देखील करत असतात.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अलाया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.