
अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) हिने ‘जवानी जानेमन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता अभिनेत्री ZEE5 वरील ‘यू टर्न’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सध्या अलाया आगामी ‘यू टर्न’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या सर्वत्र ‘यू टर्न’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

अलाया फक्त अभिनय क्षेत्रात नाही तर, सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते

अलाया हिच्या ‘यू टर्न’ सिनेमात अलाया हिच्यासोबत अभिनेत्री समंथा रुथ प्रभू देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा रंगत असते. आलायाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेटं आणि लाईक्सचा वर्षाव देखील करत असतात.