
'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावरचं एक रील मध्यंतरी प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यावर एका चिमुकल्याने व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला. तुम्हीही हा व्हीडिओ एकदा तरी पाहिला असेल.

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावरचं साईराज केंद्रे या चिमुकल्याचं रील प्रचंड व्हायरल झालं. या गाण्यावर साईराजने जे एक्सप्रेशन्स दिले, यामुळे त्याचा व्हीडिओ प्रचंड चर्चेत आला होता.

एका रीलमुळे साईराज केंद्रे प्रसिद्धी झोतात आला. आता तो मराठी मालिकेत दिसणार आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' या झी मराठीवरील मालिकेत तो दिसणार आहे.

साईराज हा 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील अप्पी आणि अर्जुन यांचा मुलगा दाखवण्यात आला आहे. अमोल हे पाक्ष साईराज साकारणार आहे.

अप्पीची उत्तराखंडला बदली झाल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर सात वर्षांनंतरचा लीप दाखवण्यात आला आहे. यात अमोलचं पात्र साईराज साकारत आहे.