
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता आणि हॉलिवूड अभिनेत्री अँजलिना जोली दिसायला अगदी सारख्याच आहेत. अँजलिनाने करिअरची सुरूवात केली तेव्हा या दोघीनीची बरीच तुलना केरण्यात आली होती.

ईशा आणि अँजेलिनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकदा या दोघी यामुळे ट्रोल झाल्या आहेत.

ईशाला यात काही हरकत नाहीये. या गोष्टी ती नेहमीच सकारात्मकतेनं घेते. ईशा म्हणाली होती की, 'लोकांना वाटतं की मी अँजेलिनासारखी दिसते, पण मला वाटतं की मी स्मिता पाटील यांच्यासारखंच काम करते.'

ईशा 2019मध्ये वन डे जस्टिस डिलीव्हर्ड चित्रपटात झळकली होती. आतापर्यंत तिनं आपला आगामी प्रोजेक्ट जाहीर केलेला नाही.

अँजेलिना एक अभिनेत्री तसेच चित्रपट निर्माती आहे आणि तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.