
बिग बॉस 16 टीआरपीमध्ये टाॅपला राहिले. या शोमध्ये प्रियंका चाैधरी हिने चांगला गेम खेळला. प्रियंका चाैधरी ही अंकित गुप्ता याच्यासोबत बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाली होती.

बिग बॉस 16 मध्ये प्रियंका चाैधरी आणि अंकित गुप्ता याची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता प्रियंका चाैधरी आणि अंकित गुप्ता यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा आनंद झालाय. कारण या व्हिडीओमध्ये अंकित गुप्ता आणि प्रियंका चाैधरीचे लग्न झाल्याचे दिसत आहे. मात्र, हा फक्त म्यूझिक व्हिडीओच आहे. रिअलमध्ये यांचे लग्न झाले नाही.

या म्यूझिक व्हिडीओमध्ये अंकित आणि प्रियंकाचे लग्न झाल्याचे दाखवण्यात आले आहे. हा म्यूझिक व्हिडीओ यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. या व्हिटीओमध्ये प्रियंकाचा लूक जबरदस्त दिसत आहे.

बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन हा झाला असून एमसी स्टॅन विजेता झाल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. जवळपास लोकांना वाटते होते की, शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरीपैकी एकजण बिग बाॅसचा विजेता होईल.