
यशराज प्रॉडक्शनचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अयान मुखर्जी याचा चित्रपट ब्रह्मास्त्रने देखील चांगली कामगिरी केलीये.

ब्रह्मास्त्र चित्रपटानंतर वॉर 2 चित्रपटासाठी अयान मुखर्जी याने होकार दिलाय. विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र हिट ठरल्यानंतर अयान मुखर्जी याने वॉर 2 चित्रपटासाठी तगडी रक्कम घेतलीये.

ऋतिक रोशन याच्या वॉर 2 ची जबाबदारी आता अयान मुखर्जी याच्यावर आहे. वॉर 2 चित्रपट अयान मुखर्जी डायरेक्ट करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत.

वॉर 2 चित्रपटासाठी अयान मुखर्जी याने तब्बल 32 कोटींची फिस घेतलीये. ब्रह्मास्त्र चित्रपट हिट ठरल्यानंतर अयान मुखर्जी याने आपल्या फिसमध्ये मोठी वाढ केलीये. अयान मुखर्जी याचे भाव वधारले आहेत.

वॉर 2 चित्रपटाला अयान मुखर्जी याने होकार दिल्याने करण जोहर हा त्याच्यावर नाराज झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. इतकेच नाहीतर करण जोहर आणि अयान मुखर्जी यांच्यामध्ये जोरदार वादही झालाय.