
टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सर्व पात्रांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. हे सर्व कलाकार इतके लोकप्रिय झाले की, आता चाहते त्यांना खऱ्या नावाऐवजी सिरियलमधील पात्रांच्या नावांनी ओळखतात.

या शोचे असेच एक लोकप्रिय पात्र म्हणजे ‘बबिता अय्यर’ (Babita), ज्यांना प्रत्येकजण ‘बबिता जीं’च्या नावाने ओळखतात.

ही गोकुळधाम सोसायटीतील सर्वात स्टायलिश महिला आहे. ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) खऱ्या आयुष्यात बरीच धाडसी आहे.

गेले अनेक दिवस ती जातीवादी शब्द वापरल्यामुळे चर्चेत होती. आता मात्र ती तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे.

तिचे हे फोटोवर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. ती या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.