
भोजपुरी सुपरस्टार राणी चटर्जी चाहत्यांच्या मनावर राज्य करते. चाहते राणीच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात.

आता कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउननंतर अखेर राणी चटर्जी पुन्हा कामावर परतली आहे. नुकतंच तिनं काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

एका फोटोत चित्रपटाचे नाव शेअर करताना राणीने लिहिलं आहे की लॉकडाउननंतर या चित्रपटाची सुरूवात करतेय... राणीच्या या चित्रपटात अभिनेता विनय आनंद दिसणार आहे.

राणी सध्या आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करतेय, आता शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूप क्यूट दिसत आहे.

राणीला कामावर परतल्याचं पाहून चाहतेही खूप आनंदी आहेत. चाहते राणीच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट्स करत आहेत.

कोरोना काळात राणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत होती.