
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री भूमी पेडणेकरनं काल म्हणजेच 18 जुलैला आपला वाढदिवस साजरा केला. आता तिने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हे फोटो भूमीच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. वाढदिवसानिमित्त तिनं आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत केक कट केला. सोबतच प्रचंड धमालही केली.

वाढदिवसासाठी भूमीच्या घराला सुंदर प्रकारे सजवण्यात आलं होतं. या डेकोरेशनसोबत भूमीनं फोटो शेअर केले.

भूमी पेडणेकरच्या वाढदिवशी मित्रमंडळींनी तिचे फोटो सर्वांसोबत शेअर केले.

सगळ्यांसोबत तिनं तिचा वाढदिवस साजरा केला आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

एवढंच नाही तर केक कट करताना भूमी प्रचंड हॉट दिसत होती. चाहत्यांना तिचा हा लूक प्रचंड आवडलेला आहे.

तिनं हे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.