
'बिग बॉस मराठी' या यंदाचा पाचवा सिझन प्रचंड गाजला. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सिझनमधील स्पर्धक त्यांच्यातील बॉन्ड प्रेक्षकांना आवडला. हे स्पर्धक बिग बॉस संपल्यानंतरही एकत्र दिसतात.

'बिग बॉस मराठी' हा शो संपल्यानंतरही या स्पर्धकांमधील नातं कायम आहे. 'बिग बॉस मराठी' मधील स्पर्धक एकमेकांना भेटत असतात. नुकतंच 'बिग बॉस मराठी'तील स्पर्धक बारामतीत भेटले होते.

'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाण, डीपी अर्थात धनंजय पोवार, इरिना, वैभव चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर एकत्र भेटले होते. या भेटीचे फोटो डीपीने शेअर केलेत.

या वेळेचा बिग बॉस खरंच चांगला झाला. या आधीच्या बिग बॉसचे स्पर्धक एवढे एकत्र कधी पाहिले नाहीत. तुमचे सर्वांचे नाते असेच राहू द्या... ही माणुसकी महाराष्टातच पाहता येते. खेळ संपला राग संपला. आता कायम एकत्र राहा, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.

'बिग बॉस मराठी' च्या घरात अनेकांचं घट्ट नातं निर्माण झालं. कोकण हार्टेड गर्ल आणि डीपी यांचं बहिण भावाचं नातं महाराष्ट्राने पाहिलं. या दोघांनी नुकतंच भाऊबीज साजरी केली. तसंच इरिना आणि डीपीने देखील भाऊबीज साजरी केली.