
अभिनेत्री मेघा धाडे... मेघा तिच्या बिंधास स्वभावासाठी ओळखली जाते. तिच्या अभिनयाला चाहत्यांची पसंती मिळते. तसंच ती सोशल मीडियावरही चर्चेत असते.

बिग बॉसच्या घरातील मेघाचा वावर सहज होता. पण ती ज्या पद्धतीने टास्ट पूर्ण करायची, ते तिच्या चाहत्यांना आवडायचं. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनची ती विजेती ठरली. बिग बॉस हिंदी च्या 12 व्या सिझनमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून तिने भाग घेतला.

मेघा धाडे आता नव्या व्यावसायात पदार्पण करतेय. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात मेघाने रिसॉर्ट सुरु केलंय. रत्नागिरीतील पावसजवळच्या गणेशगुळे इथं मेघाने रिसॉर्ट सुरु केलंय.

Villa Mangoes And Seashells हे बिच रिसॉर्ट मेघाने सुरु केलंय. समुद्र किनारी असलेल्या या रिसॉर्टमध्ये फूडही अप्रतिम मिळतं. त्यामुळे तुम्ही इथे आपल्या कुटुंबासोबत मित्रांसोबत भेट देऊ शकता.

अभिनेत्री सई लोकूर हिनेही या बिच रिसॉर्टला भेट दिली. समुद्रकिनारी वेळ घालवतानाचा फोटो सईने शेअर केला आहे. या नव्या व्यावसायासाठी मेघाला चाहते भरभरून शुभेच्छा देत आहेत.