
प्रसिद्ध छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्माने बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रवेश केला आहे. यावेळी निआने शो मध्ये अतिशय हटके अंदाजात प्रवेश केला.

नियानं घरात प्रवेश केल्याचं बघून स्पर्धक आश्चर्यचकित झाले, तर काहीजण आनंदीही झाले.

निया घरात शिरताच तिनं तिचं हटके रुप सर्वांसमोर दाखवलं. तिने अक्षरापासून राकेशपर्यंत अनेकांची स्तुती केली, तर तिने दोन स्पर्धकांना भावही दिला नाही.

नियाने अक्षराला सांगितले की तिला अक्षरापासून खूप आशा आहेत, तर नियाने शमिता शेट्टी आणि नेहा भसीमला भावच दिला नाही.

जेव्हा निया घरात आली तेव्हा ती सोनेरी रंगाच्या मोहक ड्रेसमध्ये दिसली.

घरात प्रवेश करताच तिला बिग बॉसकडून भेट मिळाली आणि ती घराची डेली बॉस बनली आहे. आता हे स्पष्ट झालं आहे की निया शोमध्ये खूप धमाका करणार आहे.