
दीपक तिजोरीला तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. मात्र बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांना अभिनेत्याचा मित्र म्हणून दाखवण्यात आलं. दीपक यांनी सलमान खानपासून अक्षय कुमारपर्यंत मोठ-मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. काहींमध्ये ते अभिनेत्याचे मित्र होते तर काहींमध्ये भाऊ.

पूर्वी अभिनेत्याच्या मित्राचे पात्र अतिशय खास आणि मनोरंजक असायचे आणि दीपक तिजोरी यासाठी परिपूर्ण होते. ते बहुतांश चित्रपटांमध्ये अभिनेत्याच्या मित्राची भूमिका साकारत होते.

सहाय्यक अभिनेता म्हणून दीपक यांचे लोकप्रिय चित्रपट म्हणजे आशिकी, खिलाडी, जो जीता वही सिकंदर, कभी हा कभी ना. दीपक यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ते एक अभिनेते म्हणून आपले करिअर सुरू करणार होते, पण त्यांना काम मिळत नव्हतं. मग 3 वर्षांनी ते एका निर्मात्याला भेटले. तोपर्यंत दीपक हॉटेलमध्ये काम करायचे.

दीपक यांना पहिल्यांदा ‘तेरे नाम’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये ते सलमानचे मित्र होते. जेव्हा अभिनेता म्हणून दीपक यांची कारकीर्द चांगली नव्हती, तेव्हा त्यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. दीपक यांनी टॉम डिक अँड हॅरी, फॉक्स आणि ख्वाइश सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

दीपक यांचे हे चित्रपटही फ्लॉप ठरले, मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही. दीपक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेमध्ये होते. त्यांच्या पत्नी शिवानीसोबतच्या नात्याबद्दल खूप गदारोळ झाला. सध्या दीपक प्रसिद्धीपासून दूर आपल्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे.