
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरननं बार्सिलोनास्थित रशियन टेनिसपटू आणि उद्योजक आंद्रेई कोशेव याच्याशी लग्न केलं आहे. ही जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. आज, श्रिया सरनच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही या जोडप्याचे काही अतिशय गोंडस फोटो दाखवणार आहोत.

ही जोडी सध्या अनेकदा मुंबईत स्पॉट होत आहे. हे दोघं 2018 पासून एकत्र आहेत.

तिने गेली अनेक वर्षे आपली लव्ह लाईफ अतिशय खाजगी ठेवली होती, मात्र आता हे दोघं आता सर्वांसमोर खुलेपणानं आपलं प्रेम व्यक्त करत आहेत.

ती पती आंद्रेई कोश्चेव्हसह तिचे बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. ती अनेकदा भारत आणि स्पेनला जात असते. सध्या ती तिच्या प्रेमानं भरलेल्या आयुष्याचा खूप आनंद घेत आहे.

श्रिया सरनची आंद्रेईसोबत पहिली भेट मालदीवमध्ये झाली होती, श्रिया सरन आंद्रेईवर खूप प्रेम करते.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर श्रेया घोषालच्या गाण्याचा हा व्हिडीओ आहे. या म्युझिक व्हिडीओचें अर्ध शूटिंग पूर्ण झालं आहे. चाहते आता हे गाणं रिलीज करण्याची मागणी करत आहेत. ते म्हणत आहे की या गाण्यासाठी जे काही शूटिंग केलं गेलं आहे, ते त्यासह रिलीज करा.

आंद्रेई कोश्चेव श्रिया सरन हे एकमेकांसाठी बनलेले आहेत हे त्यांच्या या फोटोंमधून दिसते. या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत.