
'ओम शांती ओम', 'समर 2007' आणि 'तो बात पक्की' सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या अभिनेत्री युविका चौधरीचा आज वाढदिवस आहे. युविका तिच्या क्यूटनेटसाठी चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जाते.

केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर पंजाबी चित्रपटांमध्येही युविकाने आपल्या अभिनयाची छाप मारली आहे. तिनं 'डॅडी कूल-मुंडे फूल' आणि 'यारान दा कॅचअप' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

ओम शांती ओम दिग्दर्शक फराह खानने कोका-कोलाच्या जाहिरातीत युविकाला पाहिलं होतं आणि फराहने तिला पसंत केलं होतं आणि त्यानंतर तिला शाहरुखच्या चित्रपटात संधी मिळाली.

युविकाच्या कुटुंबातील सदस्यांची इच्छा होती की तिनं डॉक्टर व्हावं, पण तिने मुंबईतून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. कोर्स संपताच तिला एका शोची ऑफर आली, मात्र तिने नकार दिला. कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यानंतर तिने तो शो केला.

युविकाला तिची खरी ओळख 'बिग बॉस 9' या रिअॅलिटी शोमधून मिळाली. या शोमध्ये तिला चाहत्यांनी खूप पसंत केले, या शो दरम्यान तिचं प्रिन्स नरुलासोबत रिलेशनशिप सुरू झालं आणि नंतर दोघांनी लग्न केले.

युविका अलीकडेच जातीयवादी शब्द वापरून वादात सापडली होती. तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.