

काही दिवसांपूर्वी शाहरुख खान याला प्रश्न विचारण्यात आला की, पहिल्यांदा तू दिल्लीवरून मुंबईमध्ये ज्यावेळी दाखल झाला, त्यावेळी तू विमानाने की रेल्वेने आला होता. यावर शाहरुख खान याने एका जुना किस्सा देखील सांगितला.

शाहरुख खान याने जो किस्सा सांगितला. त्यावेळी तो बाॅलिवूडमध्ये स्टार नव्हता आणि तो पहिल्यांदाच मुंबईमध्ये दाखल झाला होता. शाहरुख खान म्हणाला की, मी दिल्लीवरून मुंबईसाठी येण्यासाठी सीट बुक केली होती.

त्यावेळी मला माहिती नव्हते की, कोणतीही रेल्वे मुंबईमध्ये येते त्यावेळी ती लोकलच होते. एक महिला प्रवासी तिच्या कुटुंबियांसोबत माझ्या सीटवर बसत होती. त्यावेळी मी त्यांना तिथे बसण्यास मनाई केली आणि त्यांना सांगितले मी सीट बुक केलेली आहे.

पुढे मी त्यांना म्हणालो तुम्ही महिला आहेत, तुम्ही बसू शकतात पण मी तुमच्यासोबतच्या इतरांना इथे बसू देणार नाहीये. हे ऐकून त्या महिलेला इतका जास्त राग आला की, तिने माझ्या कानाखाली जाळ काढला, हा किस्सा सांगताना शाहरुख खान हसताना दिसला.