
बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा डंकी हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. थिएटरबाहेर प्रेक्षकांनी गर्दी केली आहे.

शाहरूखच्या फॅनने एक ट्विट केलं. यात टीम हार्डी वर्सेस टीम फॉरेन, या कुस्तीचा व्हीडिओ शेअर करण्यात आलाय. हे ट्विट सध्या व्हायरल होतंय.

शाहरूखच्या फॅन क्लबकडून शेअर करण्यात आलेल्या या ट्विटला शाहरूखनेदेखील उत्तर दिलंय. अरे तुम्ही सिनेमा बघायला थिएटरमध्ये जा.... बाहेर कुस्ती खेळण्यापेक्षा थिएटरमध्ये जा आणि मुव्ही इन्जॉय करा, असं शाहरूखने म्हटलं आहे.

डंकी या सिनेमात शाहरूख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नू देखील आहे. या दोघांची केमेस्ट्री आणि सिनेमाची गोष्ट प्रेक्षकांना आवडते आहे.

शाहरुखच्या डंकी या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा सिनेमा आवडल्याचं सिनेरसिक सांगत आहेत. आज रिलीज झालेला हा सिनेमा येत्या काळात किती कमाई करतो हे पाहणं महत्वाचं असेल.