
आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच अलिया भट्ट हिने तिचा 30 वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलिया सध्या लंडनमध्ये आहे.

आलिया भट्ट हिने तिचा 30 वा वाढदिवस हा लंडनमध्येच साजरा केलाय. विशेष म्हणजे आलिया भट्ट हिने तिच्या वाढदिवसाचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलिया भट्ट हिच्या फोटोंमध्ये तिची आई, बहीण आणि पती रणबीर कपूर हे दिसत आहेत. आलियाने गुलाबी रंगाचे शर्ट घातले असून चाॅकलेट केक कट करताना आलिया दिसत आहे.


आता चाहते आलिया भट्ट हिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत असून आलिया हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आलियाने यावेळी बहीण शाहिन हिच्यासोबतचा एक फोटोही शेअर केलाय.