
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची काही छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. ईशा गुप्ताचे हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांचे लक्ष विकी-कतरिनाच्या लग्नावरून हटून सोशल मीडियाकडे वळले आहे.

या नव्या फोटोंमध्ये, ईशा गुप्ता काळ्या रंगाच्या हायस्लिट ड्रेस परिधान केला आहे. या बोल्ड ड्रेसमध्ये ती छान फोटो पोझ देताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये, ईशा गुप्ताने अतिशय आय कॅचिंग स्टाईलने स्लीट कटसह तिचा टोन्ड लेग अर्थात पाय फ्लाँट केला आहे. यासह न्यूड मेकअप आणि ब्लॅक हील्सने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

या लूकसोबतच ईशाने अॅक्सेसरीजमध्ये फक्त इअर पीस आणि अंगठी कॅरी केली होती. ईशाची ही स्टाईल काही मिनिटांतच सोशल मीडियावर आगीसारखी व्हायरल झाली आहे. ईशाच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढला आहे.

2007 मध्ये ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब जिंकणारी अभिनेत्री ईशा गुप्ता हिने अभिनेता इमरान हाश्मीसोबत 'जन्नत 2' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ईशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली. अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.