
अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) हिने स्वतःला छोट्या पडद्यापर्यंत मर्यादित न ठेवता मोठ्या पडद्यावर देखील महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

करिश्मा हिने तन्ना स्कूप वेब सीरिजच्या माध्यमातून देखील चाहत्यांचं देखील मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

करिश्माने वयाच्या 17 व्या वर्षी एकता कपूर हिची ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही..

करिश्मा हिने ‘संजू’ सिनेमात देखील भूमिका बजावली.. करिश्मा वेब सीरिजच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस आली.. चाहत्यांमध्ये कायम करिश्माच्या चर्चा रंगलेल्या असतात..

सोशल मीडियावर देखील करिश्मा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.