
परिणीती हिच्यासोबत राघव यांचं लग्न होणार असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. राघव यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी येथून बी.कॉम पूर्ण केलं आहे. त्यानंतर २०११ मध्ये राघव चड्ढा यांनी सीएचं शिक्षण पूर्ण केलं.

तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनस चोप्रा कुटुंबाचा पहिला जावई आहे. भारतात देखील निक याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. निक जोनस याने घेतलेल्या शिक्षणाबद्दल देखील मोठी चर्चा रंगली आहे.

निक जोनस याने हाय स्कूलपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. पण निक याने गायन क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. निक याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील निक याच्या गाण्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.

प्रियांका आणि परिणीती बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. दोघींनी देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील दोघींच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सध्या चोप्रा आणि चड्ढा कुटुंबात परिणीती चोप्रा हिच्या लग्नाची घाई सुरु आहे. उदयपूर याठिकाणी परिणीती आणि राघव यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नाच्या ठिकाणी पाहुणे दोघांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले आहेत.