
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियावर डेनिममध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडला आहे.

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने हटके फोटोशूट केलं आहे. चाहत्यांची देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सिंपल लूकमध्ये सोनाली चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. याच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

एक काळ असा होता जेव्हा सोनाली बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत होती. पण आता मोठ्या पडद्यापासून दूर असली फॅशनमुळे चर्चेत असते.

सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते.