
बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम नव्या लूकमुळे चर्चेत असते. पण अभिनेत्री साडीत फार सुंदर दिसते. त्यामुळे यंदाच्या गणपती सोहळ्यात तुम्ही माधुरी हिचा साडीतील हटके लूक नक्की फॉलो करु शकता.

अभिनेत्री सारा अली खान देखील कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सारा देखील कायम पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट करत असते. त्यामुळे तरुण मुली गणपतीमध्ये सारा अली खान हिचा पारंपरिक लूक नक्की फॉलो करु शकता.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करते. दरम्यान अभिनेत्रीच्या लूकची देखील तुफान चर्चा रंगलेली असते. शिल्पा पारंपरिक लूकमध्ये फार सुंदर दिसते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

भिनेत्री आलिया भट्ट देखील कायम पारंपरिक लूकमध्ये फोटोशूट करत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमा दरम्यान आलिया तिच्या हटके साड्यांमुळे चर्चेत आली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी तुम्ही सुंदर दिसण्यासाठी आलिया हिचा पारंपरिक लूक फॉलो करु शकता..

अभिनेत्री कंगना रनौत देखील कायम साडी आणि ड्रेसमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही सणात कंगना हिचा पारंपरिक लूक फॉलो करु शकता... सोशल मीडियावर देखील कंगना हिचे फोटो व्हायरल होत असतात.