
यामी गौतम... बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्री... एका ब्युटी क्रिमच्या जाहिरातीने यामीला घरघरात ओळख दिली. गौतमच्या सिनेमांना लोक पसंत करतात. आर्टिकल 370 हा तिचा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

यामीच्या जाहिरातींची, तिच्या सिनेमांची सर्वत्र चर्चा होत असते. मात्र यामीच्या खासगी आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तिची लव्हस्टोरी जाणून घ्या....

मी आणि आदित्यने एकत्र एक सिनेमा केला. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी आमची मैत्री झाली. मग या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण आम्ही दोघंही याबाबत बोललो नाही, ते समजून गेलं, असं यामीने एका मुलाखती दरम्यान सांगितलं.

आम्हाला दोघांनाही फारसं बाहेर जायला आवडत नाही. आदित्य खूप चांगलं जेवण बनवतो. तो जेवण बनवतो. ते आम्ही दोघेही आवडीने खातो. तो आमचा क्वॉलिटी टाईम असतो, असं यामीने सांगितलं.

यामीने 2021 ला दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता आदित्य यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाची यावेळी जोरदार चर्चा झाली. या दोघांच्या लग्नाचे फोटो प्रचंड चर्चेत होते.