
बॉलिवूड गायिका सोना महापात्रा तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोना महापात्रा बोलताना कधीही मागेपुढे पाहात नाही.

सोना अशी एक गायिका आहे, तिनं बॉलिवूडच्या 'दबंग' सलमान खान आणि संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांच्याशी खुलेपणानं वाद घातला आहे.

2018 मध्ये सोनाने अनु मलिकवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. एवढंच नाही तर या कारणास्तव अनुला इंडियन आयडलच्या बाहेर जावं लागले.

सोना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि दररोज लोकांसमोर ती मोकळेपणाने बोलते.

सोना इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

आपल्या आवाजाने चाहत्यांना वेड लावणारी सोना आपल्याइतकीच धाडसी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.