
अभिनेत्री मोनालिसा नुकतंच पती विक्रांतसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. मोनालिसा मालदीवमधून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत होती.

आता सुट्ट्यांमध्ये धमाल केल्यानंतर मोनालिसा मालदीवहून परत आली आहे. मालदीवमधून निघताना तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मोनालिसा आणि विक्रांत विमानाच्या बाहेर पोज देताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं - बाय बाय मालदीव.

फोटोंमध्ये मोनालिसा जॉगर्ससोबत क्रॉप टॉप परिधान करून दिसत आहे. तर विक्रांत कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

मोनालिसा आणि विक्रांत यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.