
सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घ्या असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. अशात तुमचे लाडके कलाकारसुद्धा लस घेत आहेत.

लस घेतल्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांनाही लस घ्या असं कलाकार सांगत आहेत.

आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या टीमनंसुद्धा कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

टीममधील सगळ्यांनीच मालाड येथील लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये लस घेतलीये. सोनी मराठी वाहिनी आणि वेट क्लाउड प्रोडक्शन यांच्याकडून सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांना लस देण्यात आली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि त्याचे कलाकार सातत्यानं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत आणि प्रेक्षकांना हसवत आहेत. या कठीण काळात हास्यजत्रा ही जणू टेन्शनवरची मात्रा ठरत आहे.