
दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात फक्त बॉलिवूडकरांचा सन्मात करण्यात आला नसून, इतर भाषेतील सिनेमांना देखील पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं आहे.

दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर, टीव्ही विश्वातील कलाकार देखील उपस्थित होते. सिनेमा विभागात सर्वात प्रेरणादायी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री महिना चौधरी हिला दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक म्हणून नीना गुप्ता यांना पुरस्कार देण्यात आला.

सध्या सर्वत्र दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु आहे.. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यामुळे कलाकारांसाठी पुरस्कार सोहळ्याचं महत्त्व फार मोठं असतं. आपण केलेल्या कामाची पोचपावती कलाकारांना पुरस्काराच्या माध्यमातून मिळते.

दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात गायक ज्योतिका तंगरी हिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

अभिनेत्री मानसी नाईक हिला देखील मराठी सिनेमातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार २०२३ सोहळ्याची चर्चा तुफान रंगत आहे.