
सध्या धर्मेंद्र यांच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. 88 वर्षीय धर्मेंद्र यांनी स्वतःचे नाव बदललं आहे. 9 फेब्रुवारी रोजी शाहिद कपूर आणि कृती सनॉन यांचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' सिनेमा धर्मेंद्र यांनी शाहीद याच्या आजोबांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांना धर्मेंद्र सिंग देओल नावाने क्रेडिट दिलं आहे.

सांगायचं झालं तर, धर्मेंद्र याचं लहानपणीचं नाव धरम सिंगल देओल असं होतं. पण आतापर्यंत धर्मेंद्र यांनी स्वतःचं नाव बदलल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवाय नावात बदल देखील केले नाहीत.

वयाच्या 88 वर्षी देखील धर्मेंद्र अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमात देखील दमदार भूमिका साकारत धर्मेंद्र यांनी चाहत्यांचं मनोरंजन केल. किसिंग सीनमुळे धर्मेंद्र चर्चेत होते.

सोशल मीडियावर देखील धर्मेंद्र कायम सक्रिय असतता. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांची चर्चा रंगली. धर्मेंद्र देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.