
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आवाजाची जादू करणाऱ्या गायिका ऋचा शर्मा यांच्या गाण्यांनी इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे वेगळी ओळख त्यांना मिळाली आहे.

आज ऋचा शर्मा 47 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

ऋचा शर्मा यांना लहानपणापासूनच गाणी गाण्याची आवड होती. वयाच्या 8 व्या वर्षापासून जागरणला जाऊन गाणी गायला सुरुवात त्यांनी केली.

ऋचा शर्मा यांना जागरणमध्ये गाण्यासाठी पहिल्यांदा 11 रुपये मिळाले, ऋचा यांनी अनेक वेळा सांगितले की, पहिले 11 रुपये आजही ठेवले आहेत.

ऋचा यांचे वडील दयाशंकर शर्मा हे सुद्धा एक उत्तम शास्त्रीय गायक होते, जेव्हा ऋचा यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना माहित होते की, त्यांची मुलगी संगीताच्या जगात खूप नाव कमवेल.

ऋचा यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

जॉन अब्राहमच्या 'गोल' चित्रपटातील 'बिल्लो रानी' या आयटम साँगद्वारे ऋचा यांना प्रसिध्दी मिळाली.

ऋचा या नक्कीच मोठ्या स्टार बनल्या आहेत, पण त्यांना अजूनही त्यांचा संघर्ष आठवतो.