
शहनाज गिल ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार आहे. सलमान खान याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ही शहनाज गिल हिला मिळालीये.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये सलमान खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना शहनाज गिल ही दिसणार आहे. बिग बाॅसनंतर शहनाज गिल हिची फॅन फाॅलोइंगही वाढलीये.

शहनाज गिल हिने तिचे एज्युकेशन हे पंजाबमध्ये पूर्ण केले आहे. डलहौसी हिलटॉप शाळेमध्ये शहनाज गिल हिने तिचे शालेय शिक्षण पुर्ण केले. विशेष म्हणजे शहनाज गिल ही एक अभ्यासू विद्यार्थीनी होती.

उच्च शिक्षण घेण्यासाठी पंजाबमधील लवली विद्यापीठामध्ये तिने प्रवेश घेतला. कॉमर्समध्ये तिने पदवी पूर्ण केली. पंजाबची कतरिना कैफ म्हणून शहनाज गिल हिला ओळखले जाते.
