
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज तिचा 22 वा वाढदिवस साजरा करत आहे, अनन्याने 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून पदार्पण केलं. ही अभिनेत्री चंकी पांडेची मुलगी आहे. या अभिनेत्रीला 'स्टुडंट ऑफ द इयर 2' साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.

अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे, त्यामुळे ती युथ सेन्सेशन आहे.

अभिनेत्रीची संपत्ती करोडोंच्या घरात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्याची एकूण संपत्ती सुमारे 72 कोटी आहे. ती अनेक ब्रँडच्या जाहिराती करते.

ड्रग्ज प्रकरणात अनन्याचे नाव एनसीबीच्या रडारवर आले होते. खरं तर, एनसीबीला आर्यन खानच्या फोनमध्ये तिच्या आणि आर्यनच्या गप्पा झाल्या असं आढळलं होतं. त्यामुळे अभिनेत्रीला समन्स पाठवण्यात आलं होतं. अभिनेत्री तिचे वडील चंकी पांडेसोबत दोनदा एनसीबी कार्यालयात पोहोचली होती.

सध्या अभिनेत्री तिच्या आगामी 'लिगर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा देखील दिसणार आहे.