
आलिया भट्ट स्टार गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. चित्रपटाचा टीझरही काही दिवसांपूर्वी चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आला आहे.

आता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. शूटिंग संपल्यानंतर आलिया भट्टनं चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आलिया भट्टच्या (Alia bhatt) या चित्रपटाचं चित्रिकरण मुंबई फिल्म सिटी, गोरेगाव येथे झालं आहे. आता आलियानं काही फोटोंसोबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

आलियानं काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती संजय लीला भन्साळी तसेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत दिसतेय. आलियानं असंही लिहिलं आहे की आम्ही 8 डिसेंबर 2019 रोजी गंगूबाई काठियावाडी याचित्रपटाचं शूटिंग सुरु केलं होतं… आणि आता 2 वर्षानंतर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. हा चित्रपट आणि सेट 2 लॉकडाउन आणि 2 वादळांमधून गेले आहेत .. मेकिंग दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सेटनं अनेक त्रासांचा सामना केला आहे तो एक वेगळा चित्रपटच आहे.

तिनं पुढे लिहिलं, मात्र या दरम्यान बरंच काही घडलं. हा आयुष्य बदलवणारा अनुभव आहे. संजय सरांनी दिग्दर्शिन केलेल्या चित्रटात काम करणं हे माझं स्वप्न होतं. महत्त्वाचं म्हणजे आज मी हा सेट एक वेगळी व्यक्ती म्हणून सोडत आहे. खूप प्रेम सर.. धन्यवाद… तुमच्यासारखा खरोखर कोणी नाही.

यासोबतच आलियानं पुढं असंही लिहिलं आहे की जेव्हा एखादा चित्रपट संपतो तेव्हा त्यातील एक भाग संपतो, म्हणून आज मी माझा एक भागही गमावला आहे. गंगू आय लव यू! तुझी आठवण येईल…

या एका पोस्टमध्ये आलियानं आपला दोन वर्षांचा संपूर्ण अनुभव चाहत्यांसमोर मांडला आहे. अशा परिस्थितीत भावनांनी परिपूर्ण असणारी आलिया भट्टची ही पोस्ट सोशल मीडियावर अधिकच लोकप्रिय झाली आहे. आलियाच्या या पोस्टवर चाहत्यांनाही जोरदार पसंती दर्शवली आहे.