
बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सची चर्चा आहे. नवनवीन स्टार किड्स रुपेरी पडद्यावर डेब्यू करत आहे. अशा परिस्थितीत चित्रपट निर्माते इम्तियाज अलीची मुलगी इदा अलीच्या सौंदर्याची चर्चा तिच्या पदार्पणाच्या आधीच आहे.

इदा अली ही प्रसिद्ध चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची मुलगी आहे आणि ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे.

इदाचे वडील यशस्वी दिग्दर्शक आहेत, म्हणून अभिनय न करता तिला तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याची इच्छा आहे. अभिनयापेक्षा इदाचा चित्रपटसृष्टीकडे अधिक कल आहे.

इदा अलीनं तिच्या करियरला सुरुवात केली आहे. तिनं लघुपट लेखन आणि दिग्दर्शन सुरू केलं आहे. मात्र आता तिचं स्वप्न बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखलं जाण्याचं आहे.

इम्तियाजची मुलगी इदा अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपची सर्वात जवळची मैत्रीण आहे.

इदानं 'गायत्री' नावाच्या शॉर्ट फिल्मपासून दिग्दर्शनात पदार्पण केले असून यामध्ये आलियानं मुख्य भूमिका साकारली होती.

इम्तियाज अलीविषयी बोलायचं झालं तर त्यांचा 'लव आज कल' हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. या व्यतिरिक्त, इम्तियाजनं मार्च 2020 पासून नेटफ्लिक्सवर प्रवाहित होणार्या 'शी' च्या सहाय्यानं आपली वेब मालिका सुरू केली आहे. या शोमध्ये आदिती पोहनकर आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत.