AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन पासून ते दिशा पाटनीपर्यंत, ‘या’ कलाकारांनी घेतली आलिशान घरं…

महाराष्ट्र सरकारची मुद्रांक शुल्क सवलत योजना तूर्तास संपली असली, तरी मालमत्ता खरेदी करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि सध्या अनेक चित्रपट कलाकारांनी त्यात गुंतवणूक केल्याचं कळतं आहे. (From Amitabh Bachchan to Disha Patani, these artists took luxurious homes)

| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 6:58 PM
Share
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे बरेच कलाकार आहेत जे अतिशय शानदार जीवन जगतात आणि ते भरपूर पैसा कमावतात तेव्हा ते मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्याचा वापर करतात. अशा परिस्थितीत जेव्हा मालमत्ता खरेदीवर विशेष सवलत असते, तेव्हा ते कसे मागे राहतील. महाराष्ट्र सरकारची मुद्रांक शुल्क सवलत योजना तूर्तास संपली असली, तरी मालमत्ता खरेदी करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि सध्या अनेक चित्रपट कलाकारांनी त्यात गुंतवणूक केल्याचं कळतं आहे. मालमत्ता आणि गृहनिर्माण क्षेत्रातील मंदी भरून काढण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्क 5 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 पर्यंत मालमत्तेच्या करार मूल्यावर केवळ 3 टक्के मुद्रांक शुल्क कर वसूल केला गेला. यामुळे बॉलिवूड स्टार्स आकर्षित झाले त्यांनी सरकारनं दिलेल्या शिथिलतेचा पुरेपूर लाभ घेतला आणि त्यांचे पैसे लक्झरी आणि आलिशान घरांमध्ये गुंतवले. मेगास्टार अमिताभ बच्चन व्यतिरिक्त, अनेक अभिनेत्री देखील यात सामील आहेत, ज्यांनी या काळात मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण केली. ही संधी गमावू नये म्हणून अनेक कलाकारांनी गृहकर्जही घेतलं.

1 / 7
दिशा पटानी : दिशा पटानीने खार पश्चिममधील पॅरामाउंट अपार्टमेंटमध्ये 5.95 कोटींचे घर खरेदी केलं आहे. एफ विंगच्या 16 व्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे. माहितीनुसार, त्याच्या कराराची तारीख 31 मार्च आहे आणि तिनं यासाठी 17.85 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहेत.

2 / 7
राणी मुखर्जी : राणी मुखर्जीने खार पश्चिम येथील रुस्तमजी पॅरामाउंटच्या प्रकल्पात कीस्टोन रिअल्टर्स कडून 7.12 कोटी रुपयांचे अपार्टमेंट खरेदी केलं आहे. यासाठी तिनं 21.37 लाखांचे मुद्रांक शुल्क भरले. ई-विंगच्या 22 व्या मजल्यावर हे घर 1485 स्क्वेअर फूटमध्ये आहे आणि 2 कार पार्किंग स्लॉट देखील देण्यात आले आहेत.

3 / 7
अमिताभ बच्चन : बिग बींनी क्रिस्टल ग्रुपच्या अटलांटिस प्रकल्पात 5,184 स्क्वेअर फूटची मालमत्ता खरेदी केली, ज्याची किंमत 31 कोटी रुपये आहे. ही मालमत्ता डिसेंबर 2020 मध्ये खरेदी करण्यात आली होती परंतु ती एप्रिल 2021 मध्ये नोंदणीकृत करण्यात आली. यासाठी त्यांनी 2% मुद्रांक शुल्क अर्थात 62 लाख रुपये भरले.

4 / 7
सनी लिओनी : सनीनं बिग बींच्या नवीन अपार्टमेंटच्या 12 व्या मजल्यावर 3,967 च्या कार्पेट एरियासह 5 बीएचके फ्लॅट खरेदी केला. तिने अंधेरी पश्चिम येथील या अपार्टमेंटसाठी 28 मार्च 2021 रोजी 16 कोटी रुपयांमध्ये करार केला. तीन कार पार्किंग स्लॉटसह घेतलेल्या या मालमत्तेसाठी त्यांनी 48 लाखांचे मुद्रांक शुल्क भरले.

5 / 7
जान्हवी कपूर : श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिने जुहूच्या आर्या बिल्डिंगमध्ये 3,456 चौरस फूटचा ट्रिपलएक्स फ्लॅट खरेदी केला आहे, जो 14 व्या, 15 व्या आणि 16 व्या मजल्यावर आहे. 39 कोटींच्या या मालमत्तेसाठी जान्हवीने 23 कोटींचे गृहकर्ज घेतलं आहे.

6 / 7
अजय देवगण : अजय देवगणनं 29 डिसेंबर 2020 रोजी जुहू परिसरात 474.4 चौरस मीटरचा बंगला खरेदी केला ज्यासाठी त्याने 47.5 कोटी रुपये दिले. या मालमत्तेसाठी त्यांनी 18.75 कोटींचे गृहकर्ज घेतलं. अजयने या बंगल्यासाठी 2.37 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.