
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) तिच्या फॅशन सेन्ससाठी संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. तिला फॅशन आयकॉन देखील म्हटले जाते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

सोनम कपूरने आधुनिक भारतीय लेहेंग्यात फोटोशूट केले आहे आणि हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

सोनम अनेकदा तिच्या डिझायनर मित्रांनी बनवलेले ड्रेस परिधान करून फोटोशूट करत असते. सोनम इंडस्ट्रीत फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन ट्रेंड फॉलो करत असते.

इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करून सोनमने या फोटोशूटशी संबंधित सर्व लोकांचे आभारही मानले आहेत. ज्यामध्ये डिझायनर, केसरचनाकार, मेकअप फोटोग्राफीशी संबंधित सर्व लोकांचा समावेश आहे.

सोनम कपूर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. सोनम चित्रपटांमध्ये सक्रिय असली, तरी तिच्या फॅशन अॅक्टिव्हिटीमुळे ती अधिक चर्चेत असते.