
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. अनन्याची ग्लॅमरस स्टाईल तिच्या चाहत्यांनाही खूप आवडते.

अनन्याने नुकतंच तिचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

अनन्याचे हे ब्लॅक अँड व्हाईट फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. हे फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लाखो चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

सेलेब्ससोबतच चाहतेही अनन्याच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. तिची मैत्रीण नव्या नवेलीनं या फोटोवर कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अनन्या लवकरच शकुन बत्राच्या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे.