
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘रोझी’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि कूल मॉम श्वेतासारखे बोल्ड फोटो ती सुद्धा शेअर करत असते.

पलकने आता तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये ती डेनिम शॉर्ट जॅकेट आणि ऑफ व्हाईट रंगाची पॅंट आणि टॉप घालून खुर्चीवर बसलेली दिसतेय.

फोटोंमध्ये पलक वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.

पलकचे चाहते तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिलं - हॉट तर दुसऱ्यानं लिहिलं - सुंदर.