
'वाजले की बारा' म्हणत तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आज (23 नोव्हेंबर) तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे.

अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीमधील ‘फक्त लढ म्हणा’, ‘नटरंग’, ‘आयना का बायना’, ‘शाळा’, ‘वेलकम जिंदगी’ आणि ‘कटयार काळजात घुसली’ या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही अमृताने ओळख निर्माण केली आहे. ‘फुंक’ , ‘फुंक 2’, ‘राजी’, ‘सत्यमेव जयते’ 'मलंग' या हिंदी या चित्रपटांध्ये ती झळकली आहे.

अमृताच्या अभिनयासोबतच तिच्या लुक्सचीसुध्दा नेहमीच चर्चा होते. कसदार अभिनय आणि उत्तम नृत्य कलेसोबतच तिनं 'खतरो के खिलाडी' मध्येसुद्धा दमदार टास्क पूर्ण करत चाहत्यांची मनं जिंकली.

अमृताने अभिनयासोबतच टीव्ही कार्यक्रमांचं सूत्रसंचालन देखील केलं आहे. तर, आता ती युट्यूबवर देखील झळकते आहे. अमृतकला या नावाने अमृता बहारदार नृत्य सादर करते. तिच्या या व्हिडीओंना देखील प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो.