
आज ‘कुंडली भाग्य’च्या प्रीता अर्थात प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya) हिचा वाढदिवस आहे. लोकांच्या हृदयावर राज्य करणारी प्रीता 34 वर्षांची झाली आहे.

श्रद्धाने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात झी टीव्हीच्या रिअॅलिटी टॅलेंट हंट शो 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज' पासून केली. श्रद्धा त्या रिअॅलिटी शोची पहिली रनरअप ठरली.

श्रद्धा सध्या ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत दिसत आहे. या मालिकेतून तिला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.

शोमध्ये पारंपारिक अवतारात दिसणारी श्रद्धा सोशल मीडियावर अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करते.

श्रद्धा आर्या डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिये’चा देखील एक भाग आहे.

श्रद्धा वास्तविक जीवनात खूप फुडी आहे. तिला राजमा चावल, डाळ भात, चपाती, बर्गर आणि पनीर पिझ्झा खाणे खूप आवडते.