
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले लग्नबंधनात अडकल्याच्या चर्चा असते. आता अशातच तिनं सुंदर ब्रायडल फोटोशूट केलं आहे. हे फोटो शेअर करताच आता रुपाली लग्नबंधनात अडकणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

या लूकमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसते आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत.

रुपाली भोसलेला मोठी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये. सुरुवातीला शिव-वीणा-किशोरी यांच्या गटात असलेल्या रुपालीची काही वादानंतर ताटातूट झाली. त्यानंतर परागसोबत तिची वाढती जवळीक गॉसिपचा विषय ठरत होती.

‘बिग बॉस मराठी’च्या पर्वात रुपाली भोसले आणि शेफ पराग कान्हेरे यांच्या मैत्रीची चर्चा खूप रंगली होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने अंकित मगरेसोबत फोटो शेअर करत, आपण प्रेमात पडल्याचे सांगितले होते. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.