
टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री हीना खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. हीनाला इन्स्टाग्रामवर 13 दशलक्ष लोक फॉलो करतात. हीना आपल्या चाहत्यांसाठी ग्लॅमरस फोटो सतत शेअर करत असते.

हीना खान तिच्या चाहत्यांना व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याविषयीही सांगत असते. हीनानं नुकतंच एक फोटोशूट केला असून, तिच्या चाहत्यांना या फोटोशूटचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

हीनानं पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये हीनाच्या चेहऱ्यावर हसू नाही. हीनाची ही स्टाईल चाहत्यांनाही खूप आवडली आहे.

हीना पारंपरिक आणि पाश्चात्य अवतारात फोटो शेअर करते. तिचा पारंपारिक अवतार चाहत्यांनाही खूप आवडतो.

हीनानं ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. या शोमधून हीना घराघरात पोहोचली.

हिना हॅक, अनलॉक या चित्रपटात दिसली आहे. तिचे हे चित्रपट काही खास जादू दाखवू शकले नाहीत.