
आज 22 वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांचा 'हम दिल दे चुके सनम' हा आयकॉनिक चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. भव्य सेट्स आणि चित्तवेधक निर्मितींसह या चित्रपट निर्मात्यानं 1999 साली प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात नेलं होतं. या चित्रपटात अजय देवगन, सलमान खान आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत होते.

चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाल्यावर अभिनेता अजय देवगणनं त्याच्या सोशल मीडियावर शूटिंगदरम्यान काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये तो संजय लीला भन्साळी, ऐश्वर्या आणि सलमान खानसोबत दिसला आहे.

फोटो शेअर करत अजय देवगणनं लिहिलं- हम दिल दे चुके सनमला 22 वर्षे पूर्ण झाली. सलमान, संजय, ऐश आणि मला माहित होतं की आम्ही एक सुपर सेन्सिटिव्ह फिल्म बनवतोय, मात्र हा चित्रपट इतिहास घडवेल हे आम्हाला माहिती नव्हतं.

हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर कमालीचा ठसा ठरला नाही तर समीक्षकांच्याही तो पसंतीस उतरला. रिलीजच्या 22 वर्षानंतरही हा चित्रपट आजही चाहत्यांचा फेवरेट आहे.

या चित्रपटात सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अजय देवगन यांनी धमाकेदार कामगिरी केली.

समीरचा मजेदार अंदाज, नंदिनीची निरागसता आणि सौंदर्य, वनराजचं प्रेम, भन्साळीच्या प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती जागवली.

भन्साळी यांनी गुजरातची संस्कृती ज्या सौंदर्य आणि उपस्थितीनं दाखवण्याचा प्रयत्न केला ते प्रेक्षकांना आकर्षित करणारे कारण होतं. प्रेक्षकांचं प्रेम, वेगळेपणा, संयम आणि त्याग या संकल्पनेबद्दल देशभरातील प्रेक्षकांनी ‘हम दिल दे चुके सनम’चं कौतुक केलं.

इतकेच नाही तर या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक पुरस्कार आपल्या नावी केले.