
बॉलिवूडची दमदार अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतंच तिच्या 'महाराणी' या वेब सिरीजपासून चर्चेत आली आहे. आता ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहे. नुकतंच तिनं स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांना वेड लागलं आहे. या फोटोंमध्ये हुमा गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये ती गोल्डन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

फोटो शेअर करत हुमानं कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमच्यातील आंतरिक राणीला शोधा.'

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.

'गँग्स ऑफ वासेपुर', 'एक थी डायन', 'बदलापुर', ' डेढ़ इश्क़िया', 'जॉली एलएलबी 2' यासारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर हुमानं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.