
बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर एक्स पत्नी आलिया हिने काही गंभीर आरोप केले.

फक्त आलिया हिच नाहीतर नवाजुद्दीन सिद्दीकी याचा भाऊ देखील त्याच्या विरोधात पोस्ट शेअर करताना दिसला होता. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याने भाऊ आणि एक्स पत्नी आलिया यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला.


इतकेच नाहीतर यापूर्वी ज्या काही दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात आणि आपत्तीजनक पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्या डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने आपापसातील प्रश्न सोडव्याचे देखील निर्देश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते.