
सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर रिया तब्बल 28 दिवस तुरुंगात होती. अभिनेत्याच्या निधनानंतर रियावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. ड्रग्स प्रकरणार रिया हिला एनसीबीने अटक केली होती. पण 28 दिवसांनंतर अभिनेत्रीला जामिन मंजून झाला.

वादग्रस्त प्रकरणात अडकल्यानंतर रिया 'चेहरे' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमात अमिताभ बच्चन आणि इमरान हश्मी यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती.

'चेहरे' रिया 'सुपर-माची' या तेलुगू सिनेमात दिसली. त्यानंतर कोणत्याच प्रोजेक्टमध्ये रिया झळकली नाही. पण रिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

2022 नंतर रिया कोणत्याच प्रोजेक्टमध्ये झळकली नाही. पण रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करत असते.

इन्स्टाग्रामवर रिया चक्रवर्ती हिचे 35 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. रिया हिने अनेक मुलाखतींमध्ये सुशांत याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला.