
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची विजेती असलेली वनिता खरात (Vanita Kharat ) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. काही काळापूर्वीच तिच्या न्यूड फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर आता तिने आणखी एक बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे.

वनिताचा हा नवीन बोल्ड फोटोदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत वनिताचा घायाळ करणारा अंदाज दिसून येतोय.

ब्लॅक टॉप, न्यूड मेकअप आणि चेहऱ्यावर छानशी स्माईल असा हा वनिताचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

प्लस साईज, अर्थात स्थूल शरीराचाही तितक्याच आपलेपणानं स्वीकार करत त्याबाबत मनात कोणताच संकोचलेपणा न बाळगण्याचा, स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश वनिता देत आहे.

‘कबीर सिंग’ या चित्रपटात या चित्रपटात वनिताने शाहीद कपूरच्या घरी काम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. प्रसिध्द होण्यासाठी फक्त एकच सीनच पुरेसा असतो, हे वाक्य वनिताबद्दल खरं ठरलं आहे. एका सीन करता वनिता भरपूर धावली, पण याच सीनने तिला लोकप्रियता मिळवून दिली.