
आज काजल अग्रवालचा वाढदिवस आहे. काजल ही दक्षिणची लोकप्रिय अभिनेत्री आहे, मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही. गेल्या वर्षी काजलनं गौतम किचलूशी लग्न केलं होतं.

लग्नानंतर काजलचा हा पहिला वाढदिवस असून तिचा वाढदिवस खास करण्यासाठी गौतमनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यानं काजलबरोबर 30 फोटो शेअर केले आहेत.

यासोबतच त्यानं एक कॅप्शनही लिहिलं आहे, 'प्रेम कदाचित पॉपकॉर्न शेअर करणं किंवा आपला वेळ देणं म्हणजेच आपण वेळेचा आनंद घेऊ शकू….’

काजल आणि गौतम यांनी एकमेकांना 3 वर्षे एकमेकांना डेट केलं आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये दूर राहिल्यानंतर दोघांनीही ठरवलं की आता लग्न करावं. कारण त्यांना कायमचं एकत्र राहायचं होतं.